Rajanand More
बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव आणि त्यांच्या परिवारातील सदस्य नोकरीच्या बदल्यात जमीन या घोटाळ्यात अडकलेत. लालू रेल्वेमंत्री असताना घोटाळा.
सोमवारी ईडीकडून लालूंची दहा तास चौकशी. तर पुत्र तेजस्वी यादव यांची मंगळवारी चौकशी केली. राबडी देवींसह मीसा भारती व हेमा या दोन मुलींचीही नावे.
पटनातील संजय राय यांनी 3,375 स्केअर फूट जमीन 3.75 लाखांत जमीन राबडीदेवींना विकली. त्याबदल्यात राय यांच्यासह घरातील दोघांना रेल्वेत नोकरी.
हजारी राय यांनी 9,527 स्केअर फूट जमीन ए. के. इन्फोसिस्टम कंपनीला विकली. 2014 मध्ये राबडीदेवी संचालक बनल्या. राय यांच्या दोन भाच्यांना रेल्वेत नोकरी.
लालबाबू राय यांनी 13 लाखांत 1,360 स्केअर फूट जमीन राबडीदेवींना विकली. त्यानंतर मुलाची रेल्वेत भरती.
विशुन देव यांनी 3,375 स्केअर फूट जमीन ललन चौधरी यांना विकली. 2014 मध्ये हेमा यादव यांना जमीन दिली. ललन यांच्या नातवाला नोकरी.
किशुन देव राव यांनी 3,375 स्केअर फूट जमीन 3.75 लाखांत राबडीदेवींना विकली. राव यांच्या कुटुंबातील तिघांना मुंबईत रेल्वेत नोकरी.
किरण देवी यांची 80,905 स्केअर फूट जमीन मीसा भारती यांना 3.70 लाखांत दिली. मुलाला मुंबईत नोकरी.
ब्रज नंदन राय यांनी 3,375 स्केअर फूट जमीन हृदयानंद चौधरी यांनी विकली. चौधरींना हाजीपूरमध्ये नोकरी. नंतर त्यांनी हेमा यादव यांना दिली जमीन.