सरकारनामा ब्यूरो
IAS राजेश्वरी या मूळच्या कर्नाटकच्या आहेत.
कूर्ग आणि म्हैसूर येथे त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले.
कर्नाटकच्या स्टेट ओपन युनिव्हर्सिटीमधून त्यांनी इतिहास विषयात पदवी प्राप्त केली.
शिक्षण पूर्ण करताच त्यांनी यूपीएससीच्या तयारीला सुरुवात केली आणि NCERT पुस्तकांचे सलग वाचन केले.
समाजशास्त्र आणि राज्यशास्त्र पर्यायी विषय ठेवून त्यांनी अभ्यास केला.
राजेश्वरी या 48 तासांत दोनदा बदली झालेल्या अधिकारी आहेत.
2010 मध्ये 334 व्या रँकसह त्यांनी परीक्षा उत्तीर्ण केली.
सनदी अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणानंतर त्यांची झारखंड केडरमध्ये निवड करण्यात आली.
झारखंड येथे मनरेगाच्या आयुक्त पदावर होत्या, सध्या त्या दुमका येथे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत.