सरकारनामा ब्यूरो
बिहारमधील चार शक्तिशाली नेते आनंद मोहन, अवधेश मंडल, रमेश सिंह कुशवाह, अशोक महातो यांनी आपल्या पत्नींना निवडणुकीत उतरवले आहे.
आनंद मोहन
शेओहर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आनंद मोहन हे गोपालगंज कृष्णय्या यांच्या हत्येच्या आरोपाखाली 16 वर्षे तुरुंगवासानंतर त्यांची सुटका झाली.
जनता दल युनायटेडने त्याच लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिलेल्या माजी खासदार लवली आनंद या आनंद मोहन यांच्या पत्नी आहेत.
अवधेश मंडलावर खून आणि अपहरणाचे अनेक गुन्हे दाखल असून, गुन्हेगार म्हणूनच त्यांची ओळख आहे.
पाच वेळा आमदार राहिलेल्या बिमा भारती या पूर्णिया लोकसभा मतदारसंघातून आरजेडीच्या तिकिटावर निवडणूक लढवणार आहेत.
माजी आमदार रमेश सिंह कुशवाह हे 'सीपीआय एमएल'चे असून, शिवाजी दुबे हत्याकांडातील मुख्य आरोपी असून, ते तुरुंगातही गेले आहेत.
जनता दल युनायटेडच्या तिकिटावर सिवानमधून लोकसभा निवडणूक लढवणाऱ्या विजयालक्ष्मी देवी या रमेश सिंह कुशवाह यांच्या पत्नी आहेत.
2001 च्या नवादा जेल ब्रेक प्रकरणात अशोक महतो यांनी 17 वर्षे तुरुंगवास भोगल्यानंतर 2023 मध्ये त्यांची सुटका झाली.
आगामी लोकसभा निवडणुकीत अनिता कुमारी या मुंगेर लोकसभा मतदारसंघातून 'आरजेडी'च्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत.
R