सरकारनामा ब्यूरो
अनेक मुले आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी UPSCची परीक्षा देतात. मात्र, आज आपण एक अशी सक्सेस महिला IPS अधिकाऱ्याची प्रेरणादायी स्टोरी बघणार आहोत.
मंजरी जरुहर यांनी त्यांच्या आयुष्यात अनेक कठीण प्रसंग सहन केले. यातून त्यांनी मार्ग काढत त्यांचे स्वप्न पूर्ण केले आहे.
मंजरी या अतिशय हुशार आणि शिक्षित कुटुंबातून येतात. त्यांच्या कुटुंबांतील अनेक सदस्य हे IAS, IPS आहेत. कुटुंब इतक शिक्षित असेल, तर मुलीला चांगले शिक्षण मिळते. पण त्यांना हा सपोर्ट त्यांच्या कुटुंबातून मिळाला नाही.
त्यांचे लग्न वयाच्या 19व्या वर्षी एका IFS अधिकाऱ्याबरोबर झाले. पण त्यांना तेथेही शिक्षणा व्यतिरिक्त सगळं करण्याची मुभा होती. घरातील कामामुळे त्यांच्या स्वप्नांना फुलस्टाॅप लागला.
स्वप्न पूर्ण करायचं हे मनात ठेवून त्यांनी त्यांच्या सासरच्या लोकांकडून वेगळं होण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्यांनी पटना येथील गर्ल्स काॅलेजमधून इंग्लिश ऑनर्स आणि दिल्ली विद्यापीठातून ग्रॅज्युशन पूर्ण केले.
UPSC ची परीक्षेची तयार करत 1975 ला त्यांनी परीक्षा दिली. त्यांच्या रँकनुसार त्यांना IPS केडर देण्यात आले. मात्र, त्यांना IAS बनायचे होते. 1976 पुन्हा परीक्षा दिली त्यात त्यांना अपयश आले.
मंजरी यांनी IPS सेवेत स्व:ला पूर्णपणे झोकून दिले. आणि बिहारच्या पहिल्या महिला IPS अधिकारी बनण्याचा मान मिळवला. त्यांनी दाखवून दिले की तुमचे ध्येय निश्चित असेल तर ते मिळतेचं.
मंजरी जरुहर यांच्या यशस्वी आयुष्यावर ‘जय गंगा जल’ या नावाने बाॅलिवूड चित्रपट आला होता. तर 'मॅडम सर' नावाचे पुस्तक त्यांनी स्वत: लिहिले आहे, जे महिलांसाठी प्रेरणादायी आहे.