IPS Mohibullah Ansari : दहावी-बारावी सराव परीक्षेत नापास ते IPS अधिकारी, आता थेट अमेरिकेत मिळणार ‘एशियन हिरो अवॉर्ड’; कोण आहेत मोहिबुल्लाह अंसारी?

Aslam Shanedivan

मोहिबुल्लाह अंसारी

मूळचे बिहारमधील सिवान जिल्ह्यातील असलेले मोहिबुल्लाह अंसारी हे दहावी-बारावीच्या सराव परीक्षांमध्ये नापास झाले होते.

IPS Mohibullah Ansari | Sarkarnama

दिल्ली आयआयटी

पण अभ्यासात सातत्य ठेवत त्यांनी २०११ मध्ये भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) दिल्ली येथे रसायन अभियांत्रिकी शाखेत प्रवेश मिळविला.

IPS Mohibullah Ansari | Sarkarnama

UPSC

पुढे त्यांनी २०१५ मध्ये यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली. दोन प्रयत्नांतील अपयशानंतर तिसऱ्या प्रयत्नात त्यांनी ३८१वा क्रमांक मिळवत ते IPS अधिकारी झाले.

IPS Mohibullah Ansari | Sarkarnama

अमेरिका

त्यांच्या याच जिद्द, मेहनत आणि प्रेरणादायी प्रवासाची दखल आता साता समुद्रापार अमेरिकेत घेतली गेली आहे.

IPS Mohibullah Ansari | Sarkarnama

‘द एशियन हिरो अवॉर्ड’

फ्लोरिडातील टाम्पा येथे १३ डिसेंबरला त्यांना ‘द एशियन हिरो अवॉर्ड’ने सन्मानित करण्यात येणार आहे.

IPS Mohibullah Ansari | Sarkarnama

कोणाकडून पुरस्कार?

असोसिएशन ऑफ वर्ल्ड्स फेअर्स अँड फेस्ट्स यूएसए इंक या संस्थेतर्फे त्यांना हा पुरस्कार दिला जाणार आहे.

IPS Mohibullah Ansari | Sarkarnama

पुरस्काराचे कारण?

अंसारी सध्या मुजफ्फरपूरचे सिटी एसपी असून लोकसेवा, नेतृत्व आणि समाजकल्याणातील योगदानासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे.

IPS Mohibullah Ansari | Sarkarnama

प्रेरणादायी प्रवास

नापास विद्यार्थी ते आयपीएस अधिकारी आणि आता आंतरराष्ट्रीय पुरस्कारापर्यंत मारलेली मजल हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

IPS Mohibullah Ansari | Sarkarnama

26/11 Mumbai Attack : 26/11 च्या हल्ल्यातील हुतात्मा शहीद अंबादास पवारांच्या पत्नीची खाकी वर्दीतून सलामी; १७ वर्षांच्या संघर्षातून गाठले DSP पद

आणखी पाहा