Aslam Shanedivan
मुंबईवर झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात पोलीस शिपाई अंबादास पवार यांना वीरमरण आले होते.
या गोष्टीला आता तब्बल १७ वर्षे होत असून दिवंगत अंबादास पवार यांच्या पत्नी कल्पना पवार यांची संघर्षकथा समोर आली आहे.
कल्पना पवार यांनी पतीच्या बलिदानातून प्रेरणा घेत महाराष्ट्र पोलीस दलात उपअधीक्षक पदावर झेप घेतलीय.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २२ एप्रिल २०२५ रोजी कल्पना पवार यांना नियुक्तीचा आदेश मिळाला.
कल्पना पवार यांनी नाशिक येथील महाराष्ट्र पोलीस अकादमीत ११ महिन्यांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण केले आहे.
आता त्यांना अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात प्रशिक्षणार्थी प्रभारी अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला आहे.
कल्पना पवार या वाई तालुक्यातील ऐतिहासिक कवठे गावच्या सून असून या गावाने स्वातंत्र्यापासून राष्ट्रसेवेची परंपरा जपली आहे.