Rajanand More
बिहार विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबात कलह सुरू झाला आहे. त्यांच्या रोहिणी आचार्य या लेकीनं भाऊ तेजस्वी यादव यांच्यावर गंभीर आरोप करत घर सोडले आहे.
तेजस्वी यांची थोरली बहीण मीसा भारती या मात्र कुटुंबासोबत खंबीरपणे उभ्या आहेत. तसेच तेजस्वी यांनाही त्यांची साथ मिळत आहे.
मीसा भारती या लालूंच्या थोरल्या कन्या असून मागील काही वर्षांपासून त्या राजकारणात सक्रीय आहेत. लालूंच्या लेकींपैकी राजकारणात सध्या त्या एकमेव आहेत.
मीसा भारती या बिहारमधील पाटलीपूत्र लोकसभा मतदारसंघातून २०२४ मध्ये विजयी झाल्या आहेत. त्याआधी त्या राज्यसभेच्या खासदार होत्या.
मीसा भारती या एक डॉक्टर आहेत. जमशेदपूर येथील महात्मा गांधी मेमोरियल मेडिकल कॉलेजमधून त्यांनी आपले एमबीबीएस पूर्ण केले.
भावंडांमध्ये मोठ्या असल्याने मीसा भारती यांच्या शब्दाला कुटुंबात मान आहे. लालूंनंतर त्यांचाच कुटुंबात दबदबा असल्याचे सांगितले जाते.
पराभवानंतर पक्षाची बैठक झाली. यावेळी तेजस्वी यांनी विधिमंडळातील नेतेपद न घेण्याबाबत इच्छा व्यक्त केली होती. पण लालूंसह मीसा भारती यांनी त्यांनाच पाठिंबा दिला.
महिला सक्षमीकरण, स्त्री शिक्षण, महिलांविरुद्धचे गुन्हे, राजकारणात महिलांचा सहभाग आणि धोरणात्मक बाबींमध्ये त्यांना रस आहे.