Rajanand More
बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव आणि राबडी देवी यांना नऊ मुलं आहेत. रोहिणी आचार्य ही लालूंची दुसरी मोठी मुलगी.
मोठी बहीण मीसा भारती या राज्यसभेच्या खासदार तर लहान भाऊ तेजस्वी यादव हे माजी उपमुख्यमंत्री आणि दुसरे बंधू तेजप्रताप यादव आमदार.
वडिलांना 2022 मध्ये किडनी दान केल्यानंतर रोहिणी चर्चेत आल्या. किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रियेनंतर लालूंची तब्बेत सुधारली.
रोहिणी यांनी एमबीबीएसची पदवी घेतली असून शिकत असतानाच विवाह झाला. सिंगापूरमधील सॉफ्टवेअर इंजिनिअर समरेश सिंह हे पती आहेत.
सुरूवातीला पतीसह अमेरिकेत वास्तव्य. आता कुटुंबासह सिंगापूरमध्ये राहतात. त्यांना दोन मुले आहेत.
2017 मध्ये रोहिणी यांना आरजेडीकडून राज्यसभेवर पाठवण्याची तयारी असल्याची चर्चा होती. पण तसे झाले नाही.
सोशल मीडियात सक्रीय असून मागील काही महिन्यांत सातत्याने राजकीय मुद्यांवर लिहित असतात.
मुख्यमंत्री नितीशकुमारांनी काही दिवसांपुर्वी घराणेशाहीवर टीका केल्यानंतर रोहिणी यांनी त्यांचे नाव न घेता प्रत्युत्तर दिले होते.
बिहारच्या आगामी विधानसभा निवडणुकीत रोहिणी यांना तिकीट दिले जाण्याची चर्चा आहे.