Nitish Kumar Resign : नितीशकुमारांनी किती वेळा मारली पलटी? माहिती एका क्लिकवर...

Chetan Zadpe

राजकीय भूकंप -

बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप आले असून मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी भाजपसोबत सरकार स्थापण्याचा निर्धार केला आहे.

Nitish kumar Photo Collection : | Sarkarnama

शपथविधी -

नितीशकुमार महागठबंधन सरकारमधून बाहेर पडले असून आता ते भाजपसोबत सरकार स्थापन करणार आहेत. आज सायंकाळी 7.00 वाजता त्यांचा शपथविधी पार पडणार आहे.

Nitish kumar Photo Collection : | Sarkarnama

अनेकदा बदलली भूमिका -

नितीशकुमार यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत कधी भाजप तर कधी राजदसोबत राजकीय संधान बांधले. सत्तेचे समीकरण जुळवताना त्यांना राजकीय विचारसरणीचा कधीच अडसर झाला नाही.

Nitish kumar Photo Collection : | Sarkarnama

नरेंद्र मोदींना विरोध -

2013 मध्ये नितीशकुमारांनी पहिल्यांदाच यांनी भाजपशी राजकीय संबंध तोडले. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी हे एनडीएचा पंतप्रधानपदाचा उमेदवार असल्यामुळे त्यांनी एनडीएशी फारकत घेतली.

Nitish kumar Photo Collection : | Sarkarnama

लालू प्रसाद यादवांशी संधान -

बिहार 2015 च्या निवडणुकीत नितीशकुमार यांनी एकेकाळी विरोधक असलेले लालू प्रसाद यांच्या राष्ट्रीय जनता दल सोबतच काँग्रेस आणि काही इतर लहान पक्षांना सोबत घेऊन "महागठबंधन" तयार केले. 178 जागा जिंकत ते पुन्हा मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले.

Nitish kumar Photo Collection : | Sarkarnama

2017 मध्ये पुन्हा भापसोबत -

2017 मध्ये सीबीआयने कथित IRCTC घोटाळ्यात लालू प्रसाद यादव यांच्या घरावर छापे टाकले होते. यामध्ये प्रकरणी तेजस्वी यादव यांनाही आरोपी करण्यात आले. या सर्व पार्श्वभूमीवर नितीशकमार यांनी पुन्हा भाजपसोबत जाणे पसंत केले. तो पर्यंत त्यांचा मोदींनी असलेला विरोध मावळला होता.

Nitish kumar Photo Collection : | Sarkarnama

2022 मध्ये पुन्हा गठबंधन सरकार -

नितीशकुमारांची पावले 2022 पुन्हा एकदा महागठबंधनकडे वळली. भाजपसोबत युती तोडत त्यांनी आरजेडी, काँग्रेस आणि डाव्यांसोबत सत्ता चालवली. भाजपला त्यानी पुन्हा एकदा जोरदार हिसका दिला होता.

Nitish kumar Photo Collection : | Sarkarnama

पुन्हा भाजपवर प्रेम -

लोकसभा निवडणुकीला अवघे काही महिन्यांचाच अवधी राहिला असताना नितीशकुमारांनी पलटी मारली. महागठबंधन सरकारधून बाहेर पडत त्यांनी पुन्हा एकदा भाजपशी संधान बांधले. यामुळे आता भाजपसाठी बिहारची लढाई अधिक सुकर झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Nitish kumar Photo Collection : | Sarkarnama

NEXT : इंग्रजांच्या हल्ल्यात 'पंजाब केसरींचा' मृत्यू; भगत सिंगांनी 'असा' घेतला बदला!

Sarkarnama
क्लिक करा..