Rajanand More
बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव आणि राबडी देवी यांना नऊ मुलं आहेत. रोहिणी आचार्य ही लालूंची दुसरी मोठी मुलगी.
बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर रोहिणी आचार्य यांनी कुटूंबाशी नातं देखील तोडल्याचे जाहीर केले.
वडिलांना 2022 मध्ये किडनी दान केल्यानंतर रोहिणी चर्चेत आल्या होत्या. किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रियेनंतर लालूंची तब्बेत सुधारली.
रोहिणी यांनी एमबीबीएसची पदवी घेतली असून शिकत असतानाच विवाह झाला. सिंगापूरमधील सॉफ्टवेअर इंजिनिअर समरेश सिंह हे पती आहेत.
रोहिणी या आपल्या नावापुढे यादव हे आडनाव लिहित नाहीत. त्या आचार्य लिहितात. त्याचे कनेक्शन थेट त्यांच्या जन्माशी आहे.
रोहिणी यांचा जन्म १९८० मध्ये पटना मेडिकल कॉलेजमध्ये स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. कमला आचार्य यांच्या देखरेखीखाली झाला होता. त्यावेळी लालूप्रसाद राज्यातील मातब्बर नेते होते.
डॉ. आचार्य यांनी त्यावेळी लालूंकडून कसलीही फी घेतली नाही. लालूंनी आग्रह केल्यानंतर डॉक्टर म्हणाले होते की, तुमची मुलगी माझ्यासाठी प्रार्थनेसारखी आहे, त्यामुळे फीची गरज नाही. हीच बाब लालूंना भावली, असे म्हटले जाते.
रोहिणी यांच्या नामकरणावेळी लालंनी डॉक्टरांशी बोलताना तुम्ही फी घेतली नाही, त्याची भरपाई कशी करू, अशी विचारणा केली. त्यावेळी डॉक्टरांनी हसतहसत माझे नाव तिच्या नावासोबत जोडले, असे म्हटले.
डॉक्टरांचे हे शब्द खाली पडू न देता लालूंनी लगेच नामकरणाच्या कार्यक्रमातच रोहिणी या नावापुढे आचार्य जोडले आणि तेव्हापासून रोहिणी यादव ऐवजी रोहिणी आचार्य अशी त्यांची ओळख बनली.