Rajanand More
भाजपने महाराष्ट्रातून पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यासह रामदास आठवले आणि अन्य दोघांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली आहे.
विनोद तावडे यांचे नाव उमेदवारी यादीत असणार का की नाही, याबाबत उत्सुकता होती. अखेर तावडेंना संयमाचे आणि त्यांच्या कष्टाचे फळ मिळाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
महाराष्ट्रात भाजपची सत्ता आल्यानंतर बोरीवली विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या तावडेंवर चार खात्यांचे मंत्रिपद देण्यात आले. पण नंतर त्यांचे पंख छाटण्यात आले.
मंत्रिपदं मिळाल्यानंतर दोन वर्षांतच तावडेंकडील वैद्यकीय शिक्षण खातं काढून ते गिरीश महाजनांकडे देण्यात आले. ही पंख छाटण्याची सुरूवात होती.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीला काही महिनेच उरलेले असताना तावडेंकडील शालेय शिक्षण व क्रीडा ही दोन खातीही काढून घेण्यात आली. ही खाते त्यावेळी आशिष शेलांकडे दिली गेली होती.
तावडे यांना २०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये अनपेक्षितपणे उमेदवारी नाकारण्यात आली होती. त्याचवेळी त्यांची राजकीय ताकद कमी केली जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती.
२०१९ नंतर राज्यात विधान परिषद आणि राज्यसभेच्या काही निवडणुका पार पडल्या. प्रत्येकवेळी तावडेंची नाव चर्चेत होते. पण त्यांना बेदखल करण्यात आले होते.
तावडे यांना पक्षाने पक्षसंघटनेत स्थान दिले. सुरूवातीला सचिव आणि नंतर सरचिटणीस केले. तावडे मिळालेल्या संधीचे सोनं करत आपल्या कामाच्या जोरावर आपली ताकद दाखवून दिली. अखेर त्याची दखल पक्षाला घ्यावी लागली.