Mayur Ratnaparkhe
बिजू जनता दलाच्या राज्यसभा खासदार ममता मोहंता यांनी सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
ममता मोहंता 2020मध्ये राज्यसभा खासदार झाल्या होत्या.
2026 संपणार होता कार्यकाळ
ममता मोहंता यांचा कार्यकाळ 2026 मध्ये संपणार होता.
ममता मोहंता यांनी त्यांचा राज्यसभेचा कार्यकाळ संपण्याच्या दोन वर्ष आधीच राजीनामा दिला.
ममता यांच्या या निर्णयाकडे भाजपची राजकीय खेळी म्हणून बघितले जात आहे.
ममता मोहंता भाजपमध्ये प्रवेश करू शकतात, असंही बोललं जात आहे.
ममता मोहंता यांचा राजीनामा सभापतींनी तत्काळ मंजूर केला आहे.
ममता मोहंता यांनी खासदारकीचा राजीनामा का दिला याचे कारण गुलदस्त्यातच आहे.
ममता मोहंता यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने बीजेडीला धक्का बसला आहे.