Gas Cylinder Policy: गॅस सिलिंडरच्या टंचाईला ठोका कायमचा रामराम...,'हा' सक्षम पर्याय तुम्हांला माहितीय? सरकारचं अनुदानही मिळतं...

Deepak Kulkarni

युद्ध पेटलं...

मध्य पूर्वेतील इराण-इस्त्रायल-अमेरिका यांच्यातील युद्धजन्य तणावामुळे भारताच्या गॅस पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. 

LPG Vs Bio Gas Plant | Sarkarnama

गॅस पुरवठा अडचणीत

जगातील खनिज तेल आणि गॅस वाहतुकीचा मुख्य मार्ग असलेली होर्मुझची सामुद्रधुनी युद्धजन्य परिस्थितीमुळे बंद झाल्यानं भारताच्या एलपीजी आणि नैसर्गिक वायू पुरवठा अडचणीत आला.

LPG Vs Bio Gas Plant | Sarkarnama

नागरिकांच्या रांगा

राज्यात सध्या एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याने गॅस सिलेंडर घेण्यासाठी नागरिकांच्या रांगा लागल्या आहेत. घरगुती गॅसचे उत्पादन 9000 वरुन 11000 मेट्रिक टनपर्यंत वाढले.

LPG Vs Bio Gas Plant | Sarkarnama

'बायोगॅस'

आखाती देशांतील युद्धामुळे एलपीजी गॅस सिलिंडरच्या टंचाई भीती व्यक्त होत आहे. अशातच 'बायोगॅस' हा खेडेगावात एक उत्तम पर्याय म्हणून समोर येत आहे.

LPG Vs Bio Gas Plant | Sarkarnama

स्वावलंबी बनण्याचं आवाहन

राज्याच्या कृषी विभागानं आगामी काळात गॅस तुटवड्याचा फटका सहन करण्यापेक्षा बायोगॅसच्या वापर करून ग्रामीण भागातील जनतेनं स्वावलंबी बनण्याचं आवाहन केलं आहे.

LPG Vs Bio Gas Plant | Sarkarnama

सरकारकडून अनुदान

बायोगॅस प्रकल्प राबवण्यासाठी सरकारकडून अनुदान दिलं जातं.

LPG Vs Bio Gas Plant | Sarkarnama

अनुदानाची रक्कम

यात सर्वसाधारण प्रवर्गासाठी 14 हजार 350 रुपये, अनुसूचित जाती-जमातींसाठी 22 हजार रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येतं. याचवेळी बायोगॅस संयंत्राला शौचालय जोडल्यास ज्यादा सोळाशे रुपये अनुदान म्हणून दिले जातात.

LPG Vs Bio Gas Plant | Sarkarnama

कागदपत्रे...

या योजनेत सहभाग नोंदवण्यासाठी नागरिकांना आधार कार्ड, जात प्रमाणपत्र, सातबारा, पशुपालनाचं प्रमाणपत्र, बँक पासबूक आपले अर्ज संबंधित पंचायत समितीमध्ये सादर करावे लागणार आहे.

LPG Vs Bio Gas Plant | SARKARNAMA

एक सक्षम पर्याय

भविष्यकाळात बायोगॅस हा ग्रामीण भागात एलपीजी गॅस पुरवठ्यावर एक सक्षम पर्याय म्हणून पाहिलं जात आहे.

LPG Vs Bio Gas Plant | Sarkarnama

NEXT अमेरिकेने टाकला 5000 पौंड वजनाचा बॉम्ब, इराण हादरले

Bunker Buster Bomb | Sarkarnama
येथे क्लिक करा...