Rajanand More
अमेरिका आणि ईस्त्रायलकडून सातत्याने इराणवर हल्ले केले जात आहेत. इराणचे सैन्यदल खिळखिळे केल्याचा दावा अमेरिकेकडून केला जात आहे.
आता अमेरिकेकडून इराणच्या ताब्यातून होर्मूज सामुद्रधुनी घेण्यासाठी अमेरिका आक्रमक झाले असून मंगळवारी इराणच्या किनाऱ्याजवळील क्षेपणास्त्र ठिकाणांवर जोरदार हल्ला केला.
अमेरिकेने सुमारे 5 हजार पौंड म्हणजेच 2,268 किलो वजनाचे बंकर बस्टर बॉम्ब (GBU-72) वापरले. कठीण व खोलवर असलेल्या लक्ष्यांवर प्रहार करण्यासाठी हे बॉम्ब वापरले जातात.
जगात हे बॉम्ब शक्तिशाली बॉम्बपैकी एक मानले जातात. अमेरिकेने इराणवर या बॉम्बचा मारा सुरू केला आहे.
बॉम्बची किंमत अंदाजे 2.88 लाख डॉलर (सुमारे 2.4 कोटी) प्रति बॉम्ब एवढी प्रचंड आहे.
हे बॉम्ब जमिनीखाली किंवा काँक्रीटच्या थरांखाली लपवलेल्या लक्ष्यांना टार्गेट करण्यासाठी वापरले जातात.
GBU-72 हा नव्या पिढीतील बॉम्ब म्हणून ओळखला जातो. हे बॉम्ब बॉम्बर्स आणि फायटर जेट्स या लढाऊ विमानांद्वारे शत्रुच्या लक्ष्यांवर टाकता येऊ शकतात.
बंकर बस्टर बॉम्बचा वापर दुसऱ्या महायुध्दात पहिल्यांदा झाल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे हे तंत्रत्रान जुनेच आहे. मात्र, त्यामध्ये खूप बदल झाले असून ते अधिक शक्तीशाली झाले आहेत.