Aslam Shanedivan
युपीएसीची परीक्षा अतिशय कठीण असून ती कठोर परिश्रम, मेहनत आणि जीद्द ठेवून अभ्यास केल्यास क्रॅक करता येत
परिस्थितीची जाणीव, शिकण्याची इच्छा, आई-वडिलांची मेहनत, शाळेचा मदतीचा हात, शिक्षकांचं मार्गदर्शनाच्या जोरावर शिराळ्याच्या बिरजू गणेश चौधरीने देखील आयएएस व्हायचं स्वप्न साकार केलंय.
बिरजूचा प्रवास इतका सोपा नसून त्याचे आई-वडील राजस्थानमधून महाराष्ट्रातील शिराळ्यात पोटाची खळगी भरण्यासाठी आले होते
येथेच तो आश्रमशाळेत शिकून, मराठीवर प्रभुत्व मिळवून दहावीत 93 टक्के गुणांनी उत्तीर्ण झाला.
शिराळा येथील सद्गुरू आश्रमशाळेचा बिरजू गोपाल चौधरी हा माजी विद्यार्थी असून तो सन 2023 - 24 मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून देशात 187 व्या रँकने उत्तीर्ण झाला
राजस्थान सरकारने 13 आय.ए.एस. अधिकार्यांच्या नुकत्याच नियुक्त्या केल्या आहेत. यात पाली जिल्ह्याच्या सहायक जिल्हाधिकारीपदी बिरजू चौधरी यांची वर्णी लागली आहे.
सद्गुरू जंगली महाराज शिक्षण संस्थेच्या शिराळा शाखेतून फक्त बिरजूच मोठ्या पदावर पोहचला नसून येथून प्रशांत नलवडे (आय.ए.एस), रोहन जाधव (लेफ्टनंट), सोनाली हेळवी हिने कबड्डी खेळात महाराष्ट्राचं नेतृत्व केलं आहे.