आता 'इतक्या' दिवसांतच करावी लागणार जन्म-मृत्यूची नोंद; वाचा सविस्तर नियम!

सरकारनामा ब्यूरो

जन्म व मृत्यू नोंदणी

शासनाच्या विविध योजना, शैक्षणिक सवलती, शिष्यवृत्ती, पासपोर्ट, नोकरी, मतदानाचा हक्क, वारसा हक्क यांसारख्या अनेक गोष्टी थेट जन्म आणि मृत्यू नोंदणीशी जोडलेल्या असल्याने वेळेत नोंदणी करणे आवश्यक असते, तर जाणून घेऊया काय आहे प्रक्रिया.

Birth, Death Registration Process | Sarkarnama

जन्म नोंदणी आता हॉस्पिटलमध्ये

जन्म नोंदणीचा अधिकार आता शासनाने संबंधित हॉस्पिटलला दिलेला आहे. शासकीय किंवा खाजगी हॉस्पिटलमध्ये जन्म झाल्यानंतर महापालिका, ग्रामपंचायत किंवा संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेकडे अर्ज केल्यानंतर दाखला मिळतो.

Birth Registration Rules | Sarkarnama

नोंदणी

तसेचं घरी प्रसूती झाली असल्यास महापालिका ग्रामपंचायत अथवा संबंधित कार्यालयात जाऊन 21 दिवसांच्या आत नोंदणी करावी लागते.

Birth, Death Registration Process | Sarkarnama

21 दिवसांनंतर अर्ज केला तर...

जन्म किंवा मृत्यूची नोंदणी 21 दिवसांच्या आत केली जाते. 30 दिवसांनंतर एक वर्षाच्या आत दंड भरून नोंदणी करता येते. एक वर्षानंतर मात्र तहसीलदारांकडे अर्ज सादर करावा लागतो.

Birth, Death Registration Process | Sarkarnama

जन्म नोंदणीसाठी लागणारी कागदपत्रे..

रुग्णालयाचे जन्म प्रमाणपत्र किंवा डिस्चार्ज स्लिप पालकांचे आधार कार्ड घरी जन्म झाल्यास आशा सेविका/ग्रामपंचायत/स्थानिक प्राधिकरणाचे पत्र पालकांचे प्रतिज्ञापत्र लागतात

Birth, Death Registration Process | Sarkarnama

मृत्यूच्या नोंदणीसाठी

डॉक्टरांचे/रुग्णालयाचे मृत्यू प्रमाणपत्र, मृत व्यक्तीचे आधार कार्ड किंवा ओळखपत्र स्मशानभूमी दाखला ही कागदपत्रे आवश्यक असतात.

Birth, Death Registration Process | Sarkarnama

कुठे करावी लागते नोंद?

रुग्णालयात जन्म किंवा मृत्यू झाला तर संबंधित रुग्णालयात नोंद होते. मात्र जन्म किंवा मृत्यू इतर ठिकाणी झाला तर ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपालिका, महापालिका या कार्यालयात जाऊन अर्ज भरून नोंदणी करावी लागते.

Birth, Death Registration Process | Sarkarnama

मृत्यू नोंदणी का आवश्यक?

घरातील सदस्याचा मृत्यू झाल्यास त्याची अधिकृत नोंद आवश्यक असते. वारसा हक्क, बँक व्यवहार, विमा दावा यासाठी मृत्यू दाखला आवश्यक असतो.

Birth, Death Registration Process | Sarkarnama

जन्म नोंदणी का आवश्यक?

मुलांना शाळेत दाखल करण्यासाठी, शिष्यवृत्ती, वयाचा पुरावा, पासपोर्ट, मतदानाचा हक्क, आधार कार्ड यासह इतर शासकीय कामांसाठी जन्म दाखला आवश्यक आहे.

Birth Registration Rules | Sarkarnama

NEXT : इतके अपघात होतात, माणसांचे जीव जातात.. मग तरी विमानात पॅराशूट का ठेवत नाहीत?

येथे क्लिक करा.