Ganesh Sonawane
प्रवासी विमान साधारणतः 30,000 ते 40,000 फूट उंचीवर उड्डाण करते. एवढ्या उंचीवर ऑक्सिजन खूप कमी आणि तापमान अत्यंत थंड असते. अशा परिस्थितीत पॅराशूटने उडी मारणं जीवघेणं ठरू शकतं.
पॅराशूट वापरणं हे सोपं नसून त्यासाठी विशेष प्रशिक्षण लागते. सर्वसामान्य प्रवाशांना हे प्रशिक्षण नसल्याने चुकीचा वापर झाल्यास अपघात निश्चित आहे.
विमान साधारणतः ताशी 800 ते 900 किमी वेगाने उडत असते. एवढ्या वेगात उडी मारल्यास शरीरावर प्रचंड दाब पडतो आणि मृत्यूची शक्यता वाढते.
विमानाची रचना अशी असते की हवेत सहज दरवाजे उघडता येत नाहीत. चुकीच्या वेळी दरवाजा उघडल्यास संपूर्ण विमानावर धोका निर्माण होऊ शकतो.
एका विमानात 150 ते 300 पेक्षा जास्त प्रवासी असतात. प्रत्येकासाठी पॅराशूट ठेवणं म्हणजे जागा, वजन आणि व्यवस्थापनाचा मोठा प्रश्न निर्माण होतो.
पॅराशूटसारखी अतिरिक्त उपकरणे ठेवल्यास विमानाचं वजन वाढतं. त्यामुळे इंधन खर्च वाढतो आणि उड्डाण सुरक्षिततेवरही परिणाम होऊ शकतो.
फायटर जेटमध्ये पायलटसाठी इजेक्शन सीट असते. काही अनुचित घडलं तर पायलट सीटसहित बाहेर पडतो आणि पॅराशूट उघडलं जातं. मात्र प्रवासी विमानाची रचना मोठी व वेगळी असल्याने तसा पर्याय शक्य नाही.
आजकाल विमाने अत्याधुनिक सेन्सर, ऑटो-पायलट आणि सेफ्टी सिस्टिमने सज्ज असतात. इमरजन्सी लँडिंग आणि स्लाइड्ससारखे उपाय प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ठरवलेले असतात. अपघात होऊच नये यावर जास्त भर दिला जातो, पॅराशूटपेक्षा हीच खरी सुरक्षितता आहे.