सरकारनामा ब्यूरो
लालकृष्ण अडवाणी यांचा जन्म 1927 रोजी कराची येथे झाला.
अडवाणी यांनी शालेय शिक्षण कराची येथील सेंट पॅट्रिक्स हायस्कूलमधून घेतले.
वयाच्या 14व्या वर्षी अडवाणी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात प्रवेश घेतला व कराची शाखेचे पूर्णवेळ प्रचारक राहिले.
मुंबई विद्यापीठाच्या सरकारी लॉ कॉलेजमधून कायद्याची पदवी प्राप्त केली.
अडवाणींना लहानपणापासून राजकारणाव्यतिरिक्त मुख्यतः चित्रपट, वाचन आणि खेळात सगळ्यात जास्त रस आहे.
क्रिकेटची प्रचंड आवड असल्यामुळे ते नेहमीच क्रिकेट खेळत आणि आजही प्रत्येक सामना ते पाहतात.
संगीताची आवड असल्यामुळे अडवाणी नेहमीच सांस्कृतिक कार्यक्रमांना उपस्थिती लावत असून, आजही त्यांच्या आयपॉडमध्ये 300 पेक्षा अधिक गाणी स्टोअर करून ठेवली आहेत.
कराचीमध्ये असताना अडवाणी हे त्यांच्या मामासोबत सतत नाटक बघायला जात असे.
वयाच्या 14व्या वर्षापासून वाचनाची आवड असल्यामुळे अडवाणींकडे असंख्य पुस्तकांचे कलेक्शन आहे.
आवडींना प्राधान्य देणारे अडवाणी नेहमीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय कार्यकर्ते म्हणून कार्यरत आहेत.