सरकारनामा ब्यूरो
एकनाथ शिंदेंच्या हस्ते जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा येथील भारत-पाक सीमेजवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचा लोकार्पण सोहळा पार पडला.
शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्याला ३५० वर्षे पूर्ण झाले, त्यानिमित्ताने हा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला आहे.
'आम्ही पुणेकर' संस्थेचे अध्यक्ष आणि लष्करातील प्रमुख अधिकारी यांची उपस्थिती होती.
'छत्रपती शिवाजी महाराज की जय' आणि 'जय भवानी जयशिवराय' अशा घोषणांनी परिसर दुमदुमला.
या सोहळ्याला जम्मू-काश्मीरचे गव्हर्नर, तसेच महाराष्ट्रातील मंत्र्यांची उपस्थिती होती.
मुखमंत्र्यांनी कुपवाडा येथील 41 राष्ट्रीय रायफलच्या आवारातील शहीद जवानांना आदरांजली वाहिली.
जवानांसोबत दिवाळी फराळाचा आनंद घेतला.