Aslam Shanedivan
राज्यात महायुतीचे सरकार आले असून भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजपने दीड कोटी सदस्य नोंदणींच लक्ष ठेवलं आहे. जे पूर्ण झालं असून अशी नोंदणी करणारा राज्यातील पहिला पक्ष ठरला आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली माधवी नाईक यांनी पडद्या मागिल घडमोडींना वेग दिला होता.
आता हे यश भाजपच्या पदरात पडले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 6 एप्रिलला भाजपच्या स्थापना दिनीच्या औचित्यावर सर्व कार्यकर्त्यांसोबत संवाद साधणार आहेत
माधवी नाईक या भाजपच्या ज्येष्ठ नेत्या असून त्या प्रदेशाच्या सरचिटणीस आहेत.
माधवी नाईक नव्वदीच्या दशकात ठाणे महापालिकेत सलग 10 वर्षे नगरसेवक होत्या. पण त्यांच्या तिसऱ्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला
माधवी नाईक यांनी महाराष्ट्र महिला मोर्चाच्या अध्यक्ष, प्रदेश उपाध्यक्षासह ‘एअरपोर्ट ॲथोरेटी ॲाफ इंडिया’च्या केंद्र सरकार नियुक्त संचालकपदी काम केलं आहे.