Ganesh Sonawane
राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नेते व राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे चांगलेच चर्चेत आहे.
कमी उत्पन्न दाखवून सदनिका लाटल्याच्या प्रकरणात कोर्टाने शिक्षा सुनावल्यानंतर ते चर्चेत आले.
कृषीमंत्री असतानाही शेतकऱ्यांबद्दल वादग्रस्त बोलल्यामुळे त्यांच्यावर टीका झाली.
भिकारी सुद्धा एक रुपयाची भीक घेत नाही पण एक रुपयात आम्ही पीक विमा देतो असे ते म्हणाले.
त्यानंतर त्यांनी पुन्हा दुसऱ्यांदा शेतकऱ्यांना कर्जमाफीवरुन सुनावलं आहे.
कर्जमाफी मिळाल्यानंतर त्या पैशांतून तुम्ही गुंतवणूक करता का? असा उलट सवाल त्यांनी शेतकऱ्यांना केला. Manikrao Kokate
कर्जमाफी, पिकविम्याच्या पैशातून साखरपुडे, लग्न करा असं विधान त्यांनी केलं आहे.
विरोधकांनी माणिकराव कोकाटे यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.
यानंतर आता शेतकरी संघटनानी माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.