सरकारनामा ब्यूरो
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने भाजप सरकारने जनतेच्य़ा विकासासाठी त्यांचा संकल्पपत्र जाहीर केलं आहे. तर यामध्ये कोणते संकल्प तयार केले आहेत. त्याची माहिती पुढीलप्रमाणे...
या संकल्पपत्रात प्रत्येक गरीब महिलेला दरमहिन्याला 2,500 रुपये आर्थिक मदत म्हणून दिले जाणार आहेत.
जी महिला गर्भवती आहे, तिला प्रसुतीसाठी ₹21,000 ची आर्थिक मदत आणि 6 पोषण किट मोफत दिले जाणार आहेत.
प्रत्येक गरीब कुटुंबातील महिलेला 500 रुपयांमध्ये LPGचा सिलिंडर, होळी आणि दिवाळीला मोफत दिला जाईल.
भाजपा सरकार निवडून आल्यास पहिल्या कॅबिनेट बैठकीमध्ये 'आयुष्मान भारत योजना' लागू होणार होणार असल्याचं या संकल्पपत्रात जारी करण्यात आले आहे.
केंद्र सरकारकडून 25 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार आणि राज्य सरकारकडून 25 लाख रुपयांपर्यंतचे अतिरिक्त उपचार मोफत होणार आहेत.
सर्व ज्येष्ठ नागरिकांना 10 लाखांपर्यंतचे मोफत उपचार तसेच मोफत OPD वैद्यकीय आणि निदान सेवेचा यात समावेश असणार आहे.
ज्येष्ठ नागरिकांना निवृत्तीनंतर 2,000 इतक्या वेतनवरून आता प्रति महिना 2,500 रुपये आणि 70 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना, विधवा, निराधार महिलांचे निवृत्तीवेतन दरमहिन्याला 2,500 वरून 3,000 इतकं वाढवण्यात येणार आहे.
जे.जे. क्लस्टर्समध्ये अटल कॅन्टीनची स्थापना करून, केवळ 5 रुपयामध्ये मध्ये पौष्टिक आहाराची सुविधा उपलब्ध होणार आहे.
दिल्लीत 2025 ला भाजपचे सरकार आल्यास या कल्याणकारी योजना आणखी प्रभावी आणि भ्रष्टाचारमुक्त सुरू केल्या जाणार आहेत.