Sunil Balasaheb Dhumal
विनोद तावडेंवर महत्त्वाची जबाबदारी
भाजपचा राजस्थान विधिमंडळ पक्षाच्या नेता निवडीसाठी विनोद तावडे यांची निरीक्षक म्हणून नियुक्त केली आहे. तावडे यांच्यासोबत आणखी दोन नेते विधिमंडळ पक्षाचा नेता निवडतील.
राजनाथ सिंह जाणार राजस्थानला
केंद्रीय मंत्री असलेले राजनाथ सिंह हे राजस्थान विधिमंडळ पक्षाच्या निवडीत महत्त्वाची भूमिका बजावतील. त्यांची नियुक्ती निरीक्षक म्हणून करण्यात आली आहे.
केंद्रीय मंत्री पार पाडणार महत्त्वाची भूमिका
केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा यांच्यावर छत्तीसगड राज्याची जबाबदारी आहे. छत्तीसगड भाजपच्या विधिमंडळ नेत्याच्या निवडीसाठी मुंडा निरीक्षक म्हणून काम पाहणार आहेत.
छत्तीसगडमध्ये जाणार सोनोवाल
छत्तीसगडमध्ये भाजपच्या मुख्यमंत्री निवडीची जबाबदारी अर्जुन मुंडा यांच्यासह केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांना देण्यात आली आहे. निरीक्षक म्हणून ते भूमिका पार पाडतील.
राष्ट्रीय सचिवांचाही समावेश
भाजपच्या राष्ट्रीय सचिव आशा लाक्रा यांची मध्य प्रदेशच्या निरीक्षकपदी निवड झाली आहे. मनोहरलाल खट्टर यांच्यासोबत त्या मुख्यमंत्री निवडीचे काम पाहणार आहेत.
कठीण परिस्थिती हाताळणार
राज्यसभा खासदार सरोज पांडे या राजस्थानच्या निरीक्षक आहेत. सध्या मुख्यमंत्री निवडीसाठी राजस्थानमधील नेत्यांच्या स्पर्धा पाहता येथे सर्वात कठीण परिस्थिती आहे.