Sunil Balasaheb Dhumal
जामिनावर बाहेर असलेले माजी मंत्री नवाब मलिकांनी नागपूरच्या अधिवेशनात सहभाग घेतला.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर मलिकांनी अद्याप आपली भूमिका जाहीर केलेली नाही.
अधिवेशनात मात्र मलिकांनी थेट सत्ताधारी बाकावर जाऊन बसणे पसंत केले.
मलिकांवर देशद्रोहाचे आरोप करता आणि त्यांच्या मांडीला मांडी लावून बसता, असा आरोप विरोधकांनी भाजपवर केला.
यावर फडणवीसांनी अजित पवारांना लिहिलेल्या पत्रानंतर विरोधकांनी या वादात प्रफुल पटेलांनाही खेचले.
सत्ताधारी आणि विरोधात रणकंदन सुरू असताना मात्र मलिक दुसऱ्या दिवशीही शांत दिसून आले.
भाजप नेते मोहित कंबोज यांनी मलिकांवर कचरा सेठ एकदम फर्स्ट क्लास, आर्थर रोड तुरुंगात पाठवा, अशी टीका केली.