Deepak Kulkarni
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी पक्षाच्या नवी राष्ट्रीय कार्यकारिणी सोमवारी (ता.17 ऑगस्ट) जाहीर केली आहे.
भाजपकडून जाहीर करण्यात आलेल्या कार्यकारिणीत माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणींसह तीन माजी मुख्यमंत्र्यांचाही या कार्यकारिणीत समावेश आहे. त्यात भाजपच्या 13 राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि 8 राष्ट्रीय सरचिटणीस पदांची घोषणा करण्यात आली आहे.
भाजपकडून नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीत महाराष्ट्रातील चार नेत्यांना संधी देण्यात आली आहे. त्यात पीयूष गोयल, भारती पवार, विनोद तावडे आणि प्रीती गांधी यांचा समावेश आहे. गांधी यांचं 'सरप्राईज' ठरलं आहे.
भारतीय जनता पक्षाच्या एक प्रमुख आक्रमक नेत्या अन् सोशल मीडिया कार्यकर्त्या म्हणून प्रीती गांधी म्हणून कार्यरत राहिल्या आहेत.
गांधी यांच्याकडे भाजपच्या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीत सोशल मीडिया विभागासाठी सह-संयोजक (को-कन्व्हेनर) म्हणून महत्त्वाची राष्ट्रीय जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
त्यांनी यापूर्वी भारतीय जनता पार्टीमध्ये महिला मोर्चाच्या सोशल मीडियाच्या राष्ट्रीय प्रभारी तसेच महाराष्ट्र भाजपच्या माहिती तंत्रज्ञान (आयटी) व सोशल मीडिया विभागात विविध पदं भूषवली आहेत.
गांधी यांना राष्ट्रीय पातळीवरील जबाबदारी देण्यामागं भाजपची पक्षसंघटनेत डिजिटल आणि सोशल मीडिया प्रभावीपणे रुजवण्याचा हेतू असल्याची चर्चा आहे.
प्रीती गांधी या सोशल मीडियावर भाजपची बाजू अतिशय ताकदीनं मांडत असतात. त्या सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात.
प्रीती गांधी यांनी 'भाजप महिला मोर्चा'च्या राष्ट्रीय सोशल मीडिया प्रभारी म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. त्या सोशल मीडिया पक्षाच्या रणनीतीकार म्हणून प्रसिद्ध आहेत.