Jagdish Patil
पुण्यातील बालेवाडी येथील भाजपच्या अधिवेशनाला राज्यातील मंत्र्यासह केंद्रीय मंत्र्यांसह राज्यभरातील हजारो पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
या अधिवेशनाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देखील उपस्थित आहेत. त्यांचं यांचं स्वागत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं.
कार्यकर्ता हीच भाजपची ताकद, चला सर्व सज्ज होऊयात पुन्हा एकदा राज्यात कमळ फुलवूयात, असं दानवे यांनी आपल्या एक्स' अकाऊंटवर लिहिलं आहे.
महाराष्ट्र प्रदेश अधिवेशनासाठी देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: नाव लिहून नोंदणी केली.
यावेळी फडणवीसांनी राज्यात पुन्हा एकदा महायुती सरकार येणार असल्याचा दावा केला.
देवेंद्र फडणवीस यांनी आपले नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना विरोधकांच्या आरोपांना तेवढ्याच ताकदीने उत्तर देण्याचा आदेश दिला.
अधिवेशानाच्या ठिकाणी भाजपच्या अनेक महिला नेत्या देखील उपस्थित होत्या. यामध्ये पंकजा मुंडे, रक्षा खडसे, प्रीतम मुंडे यांचा समावेश होता.
अधिवेशनस्थळी एका कीटचं वाटप करण्यात आलं. ज्यामध्ये भगव्या रंगाची 'भाजप'चे BJP नाव लिहिलेली टोपी, गमछा, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आवश्यक पुस्तक आणि भाकरवडीचा डब्बा आहे.