IAS अधिकाऱ्याची पत्नी निवडणुकीच्या रिंगणात; भाजपकडून पंचायत समितीसाठी उमेदवारी

Rajanand More

IAS सुमेर सिंह गुर्जर

IAS सुमेर सिंह गुर्जर हे पंजाब केडर १९९८ च्या तुकडीचे वरिष्ठ अधिकारी आहेत. त्यांनी राज्यात अनेक महत्वाच्या पदांवर काम केले आहे. सध्या ते संरक्षण सेवा कल्याण विभागाचे प्रधान सचिव आहेत.

IAS Sumer Sigh Gurjar | Sarkarnama

पत्नी राजकारणात

गुर्जर यांच्या पत्नी पिंकी गुर्जर या राजकारणात सक्रीय आहेत. मागील काही वर्षांपासून त्या राजस्थानमध्ये भाजपच्या सक्रीय कार्यकर्त्या असून दौसा जिल्ह्यात पक्षाच्या पदाधिकारीही होत्या.

IAS Sumer Sigh Gurjar, Pinki Gurjar | Sarkarnama

उमेदवारी

राजस्थानमध्ये सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे वाहत आहे. भाजपने पिंकी गुर्जर यांना दौसा पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी दिली आहे. येत्या ३ नोव्हेंबरला मतदान होणार आहे.

Pinki Gurjar | Sarkarnama

गावोगाव प्रचार

पिंकी गुर्जर या सध्या निवडणुकीच्या प्रचारासाठी थाटमाट सोडून गावोगावी फिरत आहेत. पती सुमेर सिंह यांच्या नावाचा उल्लेख त्या प्रचारात करत आहेत. त्यामुळे त्या चर्चेत आल्या आहेत.

Pinki Gurjar | Sarkarnama

गुर्जरांचा वरचष्मा

सुमेर सिंह गुर्जर हे गुर्जर समाजातील पहिले आयएएस अधिकारी असल्याचा दावा केला जातो. ते मुळचे दौसा जिल्ह्यातील धूलकोटचे रहिवासी आहेत. त्यामुळे त्यांचा नावाचा या भागात दबदबा आहे.

IAS Sumer Sigh Gurjar | Sarkarnama

महत्वाची पदे

सुमेर सिंह यांनी पंजाबमध्ये अनेक महत्वाची पदांवर काम केले आहे. जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, प्रधान सचिव अशा जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या आहेत.

IAS Sumer Sigh Gurjar | Sarkarnama

फोटो, व्हिडिओ चर्चेत

पिंकी गुर्जर यांचा आगळ्यावेगळ्या पध्दतीने प्रचार सुरू असून त्यांचे फोटो आणि व्हिडिओ मतदारांमध्ये चर्चेचा मुद्दा ठरत आहे. सरकारी लवाजमा सोडून त्या प्रत्येक गावात फिरत आहेत.

IAS Sumer Sigh Gurjar, Pinki Gurjar | Sarkarnama

लढत अवघड

राजस्थानमध्ये भाजपची ताकद असली तरी पिंकी गुर्जर यांच्या विरोधात काँग्रेसचे मातब्बर उमेदवार असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे त्यांच्यासाठी ही लढत सोपी असणार नाही.

IAS Sumer Sigh Gurjar, Pinki Gurjar | Sarkarnama

NEXT : एकाचवेळी 700 महिला कर्मचाऱ्यांना सुटी; धडाकेबाज पोलीस अधिक्षकांच्या निर्णयाचे का होतेय कौतुक?

येथे क्लिक करा.