एकाचवेळी 700 महिला कर्मचाऱ्यांना सुटी; धडाकेबाज पोलीस अधिक्षकांच्या निर्णयाचे का होतेय कौतुक?

Rajanand More

IPS अभिमन्यू मांगलिक

उत्तर प्रदेशातील फतेहपूरचे पोलीस अधीक्षक (SP) अभिमन्यू मांगलिक यांची सध्या देशात चर्चा होत आहे. त्यांनी घेतलेल्या एका निर्णयामुळे त्यांचे पोलीस दलातही कौतुक होत आहे.

IPS Abhimanyu Manglik | Sarkarnama

महिला पोलिसांनी सुटी

मांगलिक यांनी फेतहपूर जिल्ह्यातील सुमारे ७०० महिला पोलीस कर्मचाऱ्यांना एकाचवेळी एका दिवसाची सुटी दिली आहे. यामध्ये महिला शिपायांपासून ते उपनिरीक्षकांपर्यंतच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

UP Police | Sarkarnama

कारण काय?

करवाचौथ सण साजरा करण्यासाठी पोलीस अधिक्षकांनी ही सुटी देण्याचा निर्णय घेतला आहे. याचा राज्यातील २३ पोलीस स्टेशन आणि ४० चौक्यांतील महिला कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

Karwa Chauth | Sarkarnama

४१ एन्काऊंटर

मांगलिक हे मागील आठ वर्षांपासून पोलीस सेवेत असून आतापर्यंत त्यांच्या नावावर ४१ एन्काऊंटर असल्याचा दावा केला जात आहे. त्यांना गुन्हेगारांचा कर्दनकाळ मानले जाते.

IPS Abhimanyu Manglik | Sarkarnama

उच्चशिक्षित

पोलीस अधिक्षक असलेले मांगलिक हे उच्चशिक्षित असून दिल्ली विद्यापीठातून बी.कॉम. ही पदवी प्राप्त केली आहे. सी.ए. झाल्यानंतर ते खासगी कंपनीत नोकरीत करत होते.

IPS Abhimanyu Manglik | Sarkarnama

राजीनामा

नोकरीतून त्यांना १६ लाख रुपये वार्षिक वेतन मिळत होते. नोकरी करत असतानाच त्यांनी युपीएससीची तयारी सुरू केली होती. पण पहिल्या प्रयत्नात अपयश आल्यानंतर नोकरीचा राजीनामा दिला.

IPS Abhimanyu Manglik | Sarkarnama

दुसऱ्या प्रयत्नात यश

नोकरी सोडल्यानंतर यूपीएससीची पूर्णवेळ तयारी केली. त्यानंतर २०१८ मध्ये त्यांच्या कष्टाचे चीज झाले. दुसऱ्या प्रयत्नात त्यांना यश मिळाले.

IPS Abhimanyu Manglik | Sarkarnama

महत्वाच्या जबाबदाऱ्या

बरेली येथे पहिली नियुक्ती झाल्यानंतर मांगलिक यांनी वाराणसी, सहारनपूर आणि भदोही येथेही काम केले आहे. राज्यपालांचे ADC) म्हणूनही त्यांनी कर्तव्य बजावले आहे.

IPS Abhimanyu Manglik | Sarkarnama

NEXT : भाजपच्या तिकीटावर 29 व्या वर्षी आमदार, आता 'या' महिला नेत्या थेट राष्ट्रीय राजकारणात

येथे क्लिक करा.