Pradeep Pendhare
पंतप्रधान उज्ज्वला योजनेला देखील केंद्र सरकारने मोठे बदल केल्याची अपडेट केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव प्रवीण खनुजा यांनी दिली.
उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांना पूर्वीच्या नऊ सिलिंडरऐवजी आता चार सिलिंडरवर सबसिडी दिली जाणार आहे.
देशातील उज्ज्वला योजनेचे 10 कोटी 56 लाख लाभार्थींना आता पाच सिलिंडरवरील प्रत्येकी पंधराशे रुपयांच्या वार्षिक सबसिडीला मुकावे लागणार आहे.
सबसिडीला कात्री लावण्याच्या या निर्णयामुळे केंद्र सरकारची सुमारे 16 हजार कोटी रुपयांची बचत होणार आहे.
उज्ज्वला योजनेतील सिलिंडरच्या सबसिडीवर सरकारच्या तिजोरीतून 52 हजार कोटी रुपये खर्च होत होते, त्याचा फेरविचार करण्यात आला.
सबसिडी सिलिंडर कमी करताना, उज्ज्वला योजनेतील लाभार्थींचा वार्षिक सरासरी वापर चार ते पाच एलपीजी सिलिंडरचाच असल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे.
जे सिलिंडर बाजारात 1600 रुपयांना मिळायला हवे, ते सर्वसामान्य ग्राहकांना 942 रुपयांना म्हणजे, सातशे रुपयांच्या सबसिडीने मिळत आहे.
उज्ज्वला लाभार्थींना ते आणखी तीनशे रुपयांनी स्वस्त म्हणजे 642 रुपयांना, म्हणजेच बाजारदरापेक्षा सातशे रुपयांनी स्वस्तच असणार असल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे.
देशाचे परकीय चलनसाठ्याची बचत करण्यासाठी केंद्र सरकारच्या विविध उपाययोजनांचा थेट फटका विविध लाभांच्या योजनावर देखील होताना दिसतो आहे.