Pradeep Pendhare
नीट पेपरफुटीप्रकरणात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत कॉक्रोच जनता पार्टीचे दिल्लीतील एक दिवसांचे आंदोलन संपले.
कॉक्रोच जनता पार्टीचा या आंदोलानातून काय संदेश मिळाला? याचं आता विश्लेषण केलं जात आहे.
आंदोलनांबाबत कठोर भूमिका घेणाऱ्या सरकारनं एवढी सहज याला परवानगी कशी दिली, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन हे देशातील प्रत्येक घराशी संबंधित मुद्द्यावर असून ते निकृष्ट शिक्षण व्यवस्थेविरोधात होते.
ही आंदोलनं अशा वेळी झाली, जेव्हा मोदी सरकारचा सुवर्णकाळ संपत आला आहे, असे निरीक्षणही राजकीय विश्लेषणकांनी नोंदवलं आहे.
हे आंदोलन व्यवस्थेबद्दल लोकांच्या संतापाचं आणि असंतोषाचं प्रतीक ठरले आहे.
जयप्रकाश आंदोलन, व्ही. पी. सिंग ते अण्णाचं आंदोलन दडपल, तेव्हा ती चिघळली. त्यामुळं सरकारनं आंदोलनाला परवानगी देत शमवण्याचा प्रयत्न केला.
कॉक्रोच जनता पार्टी भविष्यात राजकीय पक्ष बनले, तर हे चांगलेच होईल. पण सध्या तरी राजकीय भवितव्य नाही, असे विश्लेषकांचे निरीक्षण आहे.