Pradeep Pendhare
केंद्रामध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली 2014मध्ये पहिल्यांदा भाजपचे सरकार सत्तेवर येताच, अनेक राज्यांमध्ये भाजपचा झंझावात सुरू झाला.
गेल्या 13 वर्षांच्या काळामध्ये नऊ राज्यांमध्ये पहिल्यांदाच भाजपचे मुख्यमंत्री झाले.
महाराष्ट्र आणि हरियानामध्ये 2014 पहिल्यांदाच भाजपची सत्ता. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
आसामच्या रूपाने ईशान्य भारतात पहिल्यांदा भाजपची 2016 मध्ये सत्ता. सर्वानंद सोनोवाल भाजपचे पहिले मुख्यमंत्री. सलग तीन निवडणुकांमध्ये आसाममध्ये भाजपची सत्ता कायम.
अरूणाचल प्रदेशमध्ये 2016 मध्ये नाट्यमय राजकीय घडामोडींनंतर पेमा खांडू 33 काँग्रेस आमदारांसह भाजपमध्ये दाखल झाले आणि भाजपचे सरकार स्थापन झाले.
‘एनपीपी’बरोबर 2017मध्ये आघाडी करत भाजपने ईशान्य भारतात पाय पसरवले. अन्य पक्षांबरोबर आघाडी करीत मणिपूरमध्ये सत्ता खेचून आणली आणि एन. बिरेनसिंह मुख्यमंत्री झाले.
अनेक दशकांपासून डाव्यांचा गड असणाऱ्या त्रिपुरातील माणिक सरकार यांची सत्ता भाजपने 2018मध्ये उलथवून टाकली आणि विप्लव देव भाजपचे पहिले मुख्यमंत्री झाले.
नवीन पटनाईक यांची 2024मध्ये 24 वर्षांची सत्ता संपुष्टात आणत भाजपने पहिल्यांदाच ओडिशामध्ये बहुमत मिळविले. भाजपचे मोहन चरण माझी यांचा शपथविधी झाला.
बिहारमध्ये नितीशकुमार यांच्या राजीनाम्यानंतर, एप्रिल 2026मध्ये भाजपचे सम्राट चौधरी मुख्यमंत्री झाले.
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांची 15 वर्षांची सत्ता उलथवून शुभेंदू अधिकारी यांच्या रूपाने पहिल्यांदा भाजपचे राज्यात सत्ता आली आहे.