Chief of Defence Staff India : देशाचे नवे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ; एन. एस. राजा सुब्रमणि कोण आहेत?

Pradeep Pendhare

नवे CDS

विद्यमान CDS अनिल चौहान यांच्या निवृत्त चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून एन. एस. राजा सुब्रमणि यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

N. S. Raja Subramani | Sarkarnama

पदभार स्वीकार

अनिल चौहान यांचा कार्यकाळ 30 मे 2026 रोजी संपणार असल्याने सुब्रमणी हे 31 मे रोजी पदभार स्वीकारतील. ते तिसरे CDS असतील.

N. S. Raja Subramani | Sarkarnama

सचिव राहणार

लेफ्टिनेंट जनरल सुब्रमणि हे लष्करी विषयांच्या विभागाचे सचिव म्हणून देखील काम करतील.

N. S. Raja Subramani | Sarkarnama

यशस्वी कामगिरी

जम्मू-कश्मीर, आसाम आणि पश्चिम सीमा भागात लष्कराची संवेदनशील कामगिरी यशस्वी पार पाडल्या आहेत. गढवाल इथं रायफलबरोबर आणि लष्कराची स्ट्राइक कोअर कमान संभाळली आहे.

N. S. Raja Subramani | Sarkarnama

लष्करी सल्लागार

लेफ्टिनेंट जनरल राजा सुब्रमणी यांची लष्करी कारकीर्द दमदार असून, ते सध्या राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयामध्ये लष्करी सल्लागार म्हणून कार्यरत आहे.

N. S. Raja Subramani | Sarkarnama

महत्वाची जबाबदारी

लष्कराचे उपप्रमुख आणि सेंट्रल कमांडचे जीओसी-इन-सी सारख्या महत्त्वपूर्ण पदांवर राजा सुब्रमणि यांनी काम केले आहे.

N. S. Raja Subramani | Sarkarnama

एकत्रीकरणाची प्रक्रिया

राजा सुब्रमणि यांची नियुक्ती ही थीएटर कमांड आणि सशस्त्र दलांच्या एकत्रीकरणाच्या प्रक्रियेला पुढे नेण्यात महत्त्वपूर्ण ठरणारी आहे.

N. S. Raja Subramani | Sarkarnama

डिफेन्सचे विद्यार्थी

लेफ्टिनेंट जनरल राजा सुब्रमणि नॅशनल डिफेन्स अॅकॅडमी, जॉईंट सर्व्हिसेस कमांड अँड स्टाफ कॉलेज (यूके) आणि नॅशनल डिफेन्स कॉलेज (नवी दिल्ली) चे माजी विद्यार्थी आहे.

N. S. Raja Subramani | Sarkarnama

लंडनमधून डिग्री

किंग्स कॉलेज लंडनमधून राजा सुब्रमणि यांनी मास्टर डिग्री घेतली आहे. मद्रास विश्वविद्यालयातून संरक्षण अभ्यासक्रमात एमफिल केलं आहे.

N. S. Raja Subramani | Sarkarnama

पुरस्काराने सन्मानित

लष्करातील दमदार कामगिरीमुळे 2024 मध्ये परम विशिष्ट सेवा पदक, तर 2020 मध्ये अति विशिष्ट सेवा पदक, सेना पदक आणि विशिष्ट सेवा पदकाने सन्मानित करण्यात आले आहे.

N. S. Raja Subramani | Sarkarnama

NEXT : राज्यपालांचा ‘हा’ अधिकार काय सांगतो?

येथे क्लिक करा :