Aslam Shanedivan
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचे पडघम वाजू लागले असून नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकांच्या रणधुमाळीस सुरूवात झाली आहे.
राज्यातील महाविकास आघाडी आणि महायुतीतील मित्र पक्षांसह स्थानिक आघाड्या आणि अपक्षांनी निवडणुकीसाठी दंड थोपाटले आहेत.
भाजपने तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींसाठी प्रचारात आघाडी घेतली असून आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचारासाठी मैदानात उतरणार आहेत
फडणवीस सोमवारी त्र्यंबकेश्वर, भुसावळ शहादा, आणि कोपरगाव येथे प्रचारसभा घेणार आहेत. तसेच पुढील आठ दिवस ते प्रचारासाठी दौऱ्यावर असतील.
दरम्यान राज्यात नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकीत भाजपची बिनविरोधाची सेंच्युरी झाल्याची माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिली आहे
भाजपचे तीन नगराध्यक्षही बिनविरोध निवडून आले आहेत. ज्यात जामनेरमधून साधना महाजन, अनगर नगरपंचायतीतून प्राजक्ता पाटील आणि दोंडाईचा नगरपरिषदेतून नयनकुंवर रावल यांची निवड झाली आहे.
कुठे व किती आकडा?
भाजपचे जवळ-जवळ 105 नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत. ज्यात उत्तर महाराष्ट्रात 49, पश्चिम महाराष्ट्रात 49, कोकणात 4, मराठवाड्यात 3 आणि विदर्भात 3 असा आकडा आहे.