Devendra Fadnavis honorary doctorate : राजकारणातील ‘डॉक्टर’ फडणवीस! किती मानद पदव्यांनी झालेत सन्मानित...

Pradeep Pendhare

'डॉक्टर ऑफ सायन्स'

राहुरी इथल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा 39वा पदवीदान समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 'डॉक्टर ऑफ सायन्स', ही पदवी देत सन्मानित करण्यात आलं.

Devendra Fadnavis doctorate | Sarkarnama

कृषी अन् ऊर्जा क्षेत्र

राहुरी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने देवेंद्र फडणवीस यांनी ही पदवी देत, कृषी आणि ऊर्जा क्षेत्रातील योगदानाबद्दल हा सन्मान केला आहे.

Devendra Fadnavis doctorate | Sarkarnama

राज्यपालांकडून सन्मान

राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते पदवीचा सन्मान मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वीकार केला. कृषीमंत्री दत्ता भरणे, विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते.

Devendra Fadnavis doctorate | Sarkarnama

मानद पदव्या चर्चेत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यापूर्वी दोन मानद डाॅक्टरेट पदव्या मिळाल्या आहेत. राहुरी कृषी विद्यापीठाची ही तिसरी पदवी असणार आहे.

Devendra Fadnavis doctorate | Sarkarnama

कृषीमंत्र्यांकडून कौतुक

कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी राहुरी कृषीविद्यापीठाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस “All In One” आहेत, असे कौतुक करत, ही आपल्याकडून पदवी असल्याचे जाहीर केलं.

Devendra Fadnavis doctorate | Sarkarnama

फडणवीसांची प्रतिक्रिया

कृषीमधील एवढ्या मोठ्या विद्यापीठाकडून कौतुक होत असल्याने, पदवीचा आदरपूर्वक स्वीकार केल्याची मुख्यमंत्री फडणवीस यांनी घोषणा केली.

Devendra Fadnavis doctorate | Sarkarnama

मोफत वीज

पुढील वर्षांपासून शेतकऱ्यांना दिवसा 12 तास मोफत वीज देणार असल्याची घोषणा याच कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीसांनी केली आहे.

Devendra Fadnavis doctorate | Sarkarnama

Osaka City University

महाराष्ट्रातील सामाजिक-आर्थिक विकासासाठी केलेल्या सुधारणा आणि प्रशासनातील योगदानाबद्दल जपानच्या Osaka City Universityने फडणवीस यांना 2018 मध्ये Supreme Honorary Doctorate ही पदवी प्रदान केली.

Devendra Fadnavis doctorate | Sarkarnama

Koyasan University

जलसंवर्धन पायाभूत सुविधा विकास आणि सामाजिक समतेसाठी केलेल्या कामाची दखल घेत जपानमधील Koyasan University ने 2023मध्ये फडणवीस यांचा Doctorate of Philosophyही पदवी देत सन्मान केला.

Devendra Fadnavis doctorate | Sarkarnama

NEXT : मासिक पाळी, भारतात काय आहे नियम?

येथे क्लिक करा :