Pradeep Pendhare
महाराष्ट्रात घुसणाऱ्या बांगलादेशी घुसखोरांना रोखण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महायुती सरकारने एक मोठे पाऊल उचलले आहे.
राज्यात बेकायदेशीर बांगलादेशी स्थलांतरितांच्या वाढत्या संख्येमुळे निर्माण झालेल्या सुरक्षा धोक्यांच्या पार्श्वभूमीवर, सरकारने महत्त्वपूर्ण सूचना जारी केल्या आहेत.
बांगलादेशींची काळी यादी तयार करण्याचे आणि रेशनकार्डची पडताळणी करण्याचा आदेश दिला आहे. नवीन रेशनकार्डसाठी आणखी कडक नियम असणार आहेत.
बेकायदेशीर बांगलादेशी स्थलांतरितांना सरकारी कल्याणकारी योजनांचा लाभ मिळू नये यासाठी त्यांची काळी यादी तयार करण्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचना आहेत.
दहशतवाद विरोधी विभागाकडून मिळालेल्या 1,274 बेकायदेशीर बांगलादेशी स्थलांतरितांच्या यादी तपासून त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्याचा आदेश आहे.
पकडलेल्या बेकायदेशीर बांगलादेशी स्थलांतरितांची संपूर्ण यादी तयार करून ती विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर प्रकाशित करण्याचा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.
स्थानिक प्रतिनिधीच्या शिफारशीनुसार रेशनकार्ड वितरित केले जात असतील, अर्जदारांनी सादर केलेले सर्व कागदपत्रे किंवा त्यांचे निवासस्थान काटेकोरपणे पडताळणी होणार आहे.
या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करून, दर तीन महिन्याला प्रगती अहवाल सरकारला सादर करण्याच्या सूचना देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत.