Poonam Mahajan : भाजपच्या नेत्या, दोन वेळा खासदार पूनम महाजन यांचा यंदा पत्ता कट

Sunil Balasaheb Dhumal

भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांची मुलगी खासदार पूनम महाजन यांचा लोकसभेतून पत्ता कट करण्यात आला आहे.

Poonam Mahajan | Sarkarnama

त्यांच्या उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून भाजपने आता अॅड. उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिली.

Poonam Mahajan | Sarkarnama

पूनम महाजन यांनी 2009 मध्ये घाटकोपर पश्चिममधून पहिल्यांदा निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांचा पराभव झाला होता.

Poonam Mahajan | Sarkarnama

2014 मध्ये त्यांनी मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून काँग्रेसच्या प्रिया दत्त यांचा पराभव केला.

Poonam Mahajan | Sarkarnama

पूनम महाजन यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीतही विजय मिळवला होता.

Poonam Mahajan | Sarkarnama

पूनम या प्रशिक्षित पायलट आहेत. त्यांनी अमेरिकेतील टेक्सास येथून पायलटचे प्रशिक्षण घेतले आहे.

Poonam Mahajan | Sarkarnama

त्यांनी 2012 मध्ये ब्राइटन स्कूल ऑफ बिझनेस अँड मॅनेजमेंटमधून बी.टेक पदवी पूर्ण केली.

Poonam Mahajan | Sarkarnama

NEXT : भाजप उमेदवार अ‍ॅड. उज्ज्वल निकमांनी लढवलेले 'हायव्हाेल्टेज' खटले; पाहा एका क्लिकवर!