Rajanand More
दक्षिणेतील सुषमा स्वराज आणि भाजपच्या फायरब्रँड नेत्या म्हणून ओळख. आंध्र प्रदेश भाजपच्या प्रदेशाध्यक्ष व खासदार आहेत.
लोकसभा अध्यक्षपदासाठी चर्चेतील नाव. टीडीपीचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांना शह देण्यासाठी ही खेळी असल्याची चर्चा.
चंद्राबाबू नायडू यांच्या पत्नीच्या भगिनी आणि टीडीपीचे संस्थापक एन. टी. रामाराव यांच्या कन्या आहेत. त्यामुळे मोठा राजकीय वारसा.
आंध्र प्रदेशात लोकसभा व विधानसभा निवडणुकीत पक्षाचे नेतृत्व करत घवघवीत यश मिळवले. लोकसभेत सहा जागांंवर विजय.
सध्या राजामुंद्री लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या खासदार. यापुर्वी दोन वेळा काँग्रेसच्या खासदार राहिल्या. यूपीए सरकारमध्ये मंत्री म्हणूनही काम.
2014 मध्ये काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला. आंध्र प्रदेशचे विभाजन करण्याच्या निर्णयामुळे होत्या नाराज.
चंद्राबाबू यांच्या विरोधक म्हणून ओळख होती. पण त्यांना एनडीएमध्ये आणण्यात मोठा वाटा.
नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता होती. पण आता लोकसभा अध्यक्षपदासाठी नाव चर्चेत.
पुरंदेश्वरी या अध्यक्ष झाल्यास भाजपकडून एका दगडात दोन पक्षी मारल्यासारखे होईल. चंद्राबाबू विरोध करणार नाहीत आणि हे पद भाजपकडेच राहील.