Ganesh Sonawane
राज्यातील महापालिका निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. १५ जानेवारीला मतदान व १६ जानेवारीला निकाल लागणार आहे.
नाशिक महापालिका निवडणुकीत गैरप्रकार रोखण्यासाठी भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
भाग क्रमांक ७, १२ व २४ करीता निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. अप्पासाहेब शिंदे यांनी १८ भरारी पथकांची नियुक्ती केली आहे.
निवडणुकीसाठी दहा निवडणूक अधिकारी कार्यालयांची निर्मिती करण्यात आली आहे.
सरासरी तीन प्रभागांसाठी एक याप्रमाणे ३१ प्रभागांकरिता दहा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आहे.
या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांमार्फत निवडणुकीची प्रशासकीय कार्यवाही सुरू केली आहे. प्रभाग ७, १२, २४ करिता १८ भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मुख्य नियंत्रण कक्ष, नामनिर्देशन व्यवस्थापन, ईव्हीएम व्यवस्थापन, आचारसंहिता कक्ष, साहित्य कक्ष, विविध परवाना कक्ष, उमेदवारी खर्च कक्ष, मिडिया सेंटर कक्ष, आरोग्य वैद्यकीय सुविधा व दिव्यांग मतदारांना सुविधा पुरविण्याबाबतची जबाबदारी या भरारी पथकांवर सोपविण्यात आली आहे.
पथकात नियुक्त करण्यात आलेल्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना कामकाजाबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.