Jagdish Patil
केंद्रात आणि बहुतांश राज्यातही भाजप सत्तेत आहे. तर याच पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त आजपर्यंतच्या भाजप अध्यक्षांची नावे आणि त्यांचा कार्यकाळ जाणून घेऊया.
1980 मध्ये भाजपची स्थापना झाल्यानंतर अटलबिहारी वाजपेयी पहिले अध्यक्ष बनले होते. त्यांचा कार्यकाळ (1980 ते 1986)
ज्येष्ठ नेते आणि देशाचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी यांच्याकडे 1986 ते 1991 या कालावधीत अध्यक्षपदाची धुरा होती.
भाजपच्या संस्थापक सदस्यांपैकी एक असलेले मुरली मनोहर जोशी हे 1991 ते 1993 पर्यंत अध्यक्ष होते. त्यानंतर पुन्हा 1993-1998 याकाळात आडवाणी अध्यक्ष बनले.
त्यानंतर कुशाभाऊ ठाकरे हे 1998 ते 2000, तर बंगारू लक्ष्मण हे 2000 ते 2001 पर्यंत भाजपच्या अध्यक्षपदी होते.
2001 ते 2004 सालापर्यंत के. जन कृष्णमूर्ती आणि व्यंकय्या नायडू यांनी अनुक्रमे 2 वर्षे पक्षाचा कारभार सांभाळला. त्यानंतर पुन्हा आडवाणी 2006 पर्यंत अध्यक्ष बनले.
देशाचे विद्यमान संरक्षण मंत्री असलेले राजनाथ सिंह यांच्याकडे 2006 ते 2009 आणि त्यानंतर 23 जानेवारी 2013 ते 2014 पर्यंत पक्षाचं अध्यक्षपद होतं.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे 2009 ते 2013 या काळात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होते.
तर गृहमंत्री अमित शाह यांनी 2014 पासून 2020 पर्यंत पक्षाची कमान सांभाळली.
अमित शहा यांच्यानंतर 2020 पासून ते आतापर्यंत भाजपचे अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांच्याकडे आहे.