Pradeep Pendhare
अरुणाचल विधानसभा 2024 निवडणुकीत पेमा खांडू पूर्वीच त्यांच्या जागेवरून बिनविरोध निवडणूक जिंकले.
अरुणाचल प्रदेश विधानसभा 2024 च्या निवडणुकीत भाजपला पुन्हा एकदा दणदणीत विजय मिळवून दिला.
2019 मध्ये भाजपने 41 जागा जिंकल्या होत्या, यावेळी 2024 मध्ये भाजपच्या जागा वाढून संख्या 47 वर पोहोचेली आहे.
भाजपमध्ये 2019 मध्ये त्यांच्याच नेतृत्वाखाली यश मिळवले होते. आता 2024 मध्ये तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी विराजमान होतील.
भाजपने मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली आणि निवडणुकीत चमकदारपणे लढवली.
पेमा खांडू पूर्वी काँग्रेसमध्ये होते. खांडू यांनी 2016 मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले होते.
30 जून 2011 रोजी पहिल्यादा ते मुक्तो मतदारसंघातून आमदार म्हणून बिनविरोध निवडून आले. या मतदारसंघात त्यांचे वडील आमदार होते.
दिल्ली विद्यापीठाच्या हिंदू कॉलेजमधून पदवी घेतलेल्या पेमा खांडू आक्रमक नेतृत्व म्हणून ओळखले जाते.
पेमा खांडू 2014 मध्ये मंत्रिमंडळात पहिल्यांदा सहभागी होत, राज्याचे पर्यटन आणि जलसंपदा मंत्री म्हणूनही काम पाहिले.