Akshay Sabale
सिक्कीम विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी 'सिक्कीम क्रांती मोर्चा'नं पुन्हा सत्ता काबीज केली आहे. मुख्यमंत्री प्रेम सिंह तमांग यांच्या रणनीतीपुढे व विरोधक सुफडासाफ झालेत.
विधानसभा निवडणुकीत 'सिक्कीम क्रांती मोर्चा'ला 31 पैकी 31 जागा मिळाल्या आहेत. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या सिक्कीम डेमोक्रेटिक फ्रंटला एका जागेवर समाधान मानावं लागलं.
प्रेम सिंह तमांग यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत 17 जागांवर विजय मिळवत राज्यात 24 वर्षाहून अधिक काळ सत्तेत असलेल्या चामलिंग सरकारचा पराभव केला होता.
पवन कुमार चामलिंग यांच्या 'एसडीएफ'चे संस्थापक सदस्य असलेल्या प्रेम सिंह तमांग यांनी 2013 मध्ये बंड करत 'एसकेएम'ची स्थापना केली.
भ्रष्टाचार, कुशासन असे मुद्दे उपस्थित करून सिंह यांनी लोकांमध्ये पोहचण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर वर्षभरातच झालेल्या निवडणुकीत त्यांना दहा जागा मिळाल्या होत्या.
तमांग हे सरकारी शाळेमध्ये शिक्षक होते. तीन वर्ष नोकरी केल्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला. 'एसडीएफ' पक्षाच्या उभारणीत त्यांनी मोठा वाटा उचलला.
जवळपास तीन दशकांपासून राजकारणात असलेल्या तमांग यांची वाटचाल खडतर राहिली. 1995 नंतर सलग पाचवेळा ते आमदार होते. 'एसडीएफ'च्या सरकारमध्ये मंत्री म्हणूनही काम केले.
मंत्री असताना सरकारी पैशांची हेराफेरी केल्याप्रकरणी तमांग यांना दोषी ठरवलं होतं. याप्रकरणी 2016 मध्ये ते तुरुंगात गेले होते.
मात्र, 2009 मध्ये त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. त्यामुळे नाराज तमांग यांनी 2013 मध्ये 'एसकेएम'ची स्थापना केली.