सरकारनामा ब्यूरो
महाराष्ट्राच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीचे पालकमंत्रिपद स्वत:कडे घेतले आहे. भाजपच्या इतर कोणत्या नेत्यांकडे पालकमंत्रिपद देण्यात आला आहे. जाणून घेऊयात...
सांगलीच्या पालकमंत्रिपदाची सूत्रे पुन्हा एकदा चंद्रकांत पाटील यांच्याकडे सोपवण्यात आली आहेत. ते 2014 ते 2016 यादरम्यान सांगलीचे पालकमंत्री होते.
नाशिकच्या पालकमंत्री पदावर अखेर गिरीश महाजन यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना अमरावती आणि नागपूर या दोन जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आली.
सिंधुदुर्गचे पालकमंत्रिपद मिळवण्यात मंत्री नितेश राणे यांना यश आले आहे. त्यांनी पुन्हा आपली ताकद दाखवून दिली आहे.
पंकजा मुंडे यांच्याकडे जालन्याचं पालकमंत्रिपद देण्यात आलं आहे. त्यांच्याकडे नांदेडची जबाबदारी दिली जाईल, अशी चर्चा होती.
अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्रिपद पुन्हा एकदा राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे सोपविण्यात आले आहे.
लातूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची वर्णी लागली आहे.
परभणीत मेघना बोर्डीकर, वर्ध्यात पंकज भोयर, चंद्रपूर येथून अशोक उईके यांची वर्णी लागली आहे.