सरकारनामा ब्युरो
विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी भाजपने संजय केनेकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
केनेकर हे विद्यार्थी दशेपासून भाजपामध्ये कार्यरत आहे. कार्यकर्ता म्हणून त्यांनी पक्षात काम करायला सुरूवात केली होती.
त्यानंतर भारतीय जनता युवा मोर्चा वार्ड अध्यक्ष ते प्रदेश उपाध्यक्ष अशी 12 वर्षे त्यांनी संघटनेते विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या.
छत्रपती संभाजीनगर महापालिकेत पंधरा वर्ष नगरसेवक आणि उपमहापौरपदही केनेकर यांना मिळाले.
भारतीय जनता पक्षाच्या कामगार आघाडीचे प्रदेश सरचिटणीस आणि प्रदेशाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रातील नितीन गडकरी आणि अनेक मंत्र्यांसोबत त्यांचे चांगले संबंध आहेत.
2014 नंतर केनेकर यांनी आक्रमकपणे शहर-जिल्हाध्यक्ष म्हणून संघटना मजबूत केली. भाजपाला जिल्हा पातळीवर नवी ओळख निर्माण करून दिली.
महाराष्ट्र शासनाकडून 12 जुलै 2019 रोजी म्हाडाचे सभापती म्हणूनही काम करण्याची संधी केनेकर यांना मिळाली.
भाजपामध्ये 1988 ते 2024 असा 35 वर्षांचा त्यांचा राजकीय प्रवास आहे.
यापूर्वी दोनवेळा आमदार होण्याचे त्यांचे स्वप्न भंगले होते. 2014 मध्ये अतुल सावे यांना पक्षाने उमेदवारी दिली आणि केनेकर यांना माघार घ्यावी लागली.
2021 मध्ये प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेवर बिनविरोध निवडून द्यायचे म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या केनेकरांना माघार घ्यावी लागली होती.