Jay Pawar नेमकं करतात तरी काय? बिझनेस की पॉलिटिक्स?

सरकारनामा ब्यूरो

अजित पवार यांचे धाकटे सुपुत्र जय पवार यांचा साखरपुडा होणार आहे. फलटणचे उद्योजक प्रवीण पाटील यांच्या कन्या ऋतुजा यांच्याशी त्यांचा विवाह ठरला आहे,

Jay Pawar | Sarkarnama

जय पवार हे उच्च शिक्षित असून त्यांना व्यवसायात जास्त रस आहे.

Jay Pawar | Sarkarnama

2023 पर्यंत ते कुटुंबियांचा दुबईतील व्यवसाय संभाळत होते. मात्र राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर ते बारामतीमध्ये परत आले.

Jay Pawar Wedding | Sarkarnama

त्यानंतर त्यांनी बारामतीमधील राजकारणात आणि कुटुंबाच्या व्यवसायात लक्ष घातले.

Jay Pawar Wedding | Sarkarnama

मागील दोन वर्षांपासून जय पवार यांचा बारामतीमधील विविध गोष्टींतील सक्रिय सहभाग वाढला असल्याचे कार्यकर्ते सांगतात.

Jay Pawar | Sarkarnama

लोकसभा निवडणुकीवेळी आई सुनेत्रा पवार तर विधानसभा निवडणुकीवेळी वडील अजित पवार यांच्या त्यांनी प्रचारात सक्रिय सहभाग घेतला होता.

Jay Ajit Pawar | Sarkarnama

बारामतीमध्ये कुस्तीच्या आणि कबड्डीच्या स्पर्धा आयोजित करण्यात, रोजगार मेळावा आयोजित करण्यात त्यांचा पुढाकार असतो.

Jay Pawar Wedding | Sarkarnama

स्थानिकांच्या माहितीनुसार, जय पवार गुरुवारी जनता दरबार भरवतात. तिथे ते बारामती आणि आसपासच्या लोकांना भेटतात, त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतात.

Jay Pawar | Sarkarnama

अनेक वेळा ते गुरुवारी लोकांना भेटण्यासाठी गाव भेटीचा दौराही काढतात. समस्यांना अजित पवार यांच्यापर्यंत घेऊन जातात.

Jay Pawar | Sarkarnama

जय पवार यांची व्यावसायिक पार्श्वभूमीचा आहे. त्यांची कामाची शैली देखील कॉर्पोरेट आहे. पण ते खूप मृदुभाषी आणि भावनिक आहेत.

Jay Pawar | Sarkarnama

एमपीएससीच्या सर्व परीक्षा आता मराठीतही होणार : देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

MPSC Exam | Sarkarnama
येथे क्लिक करा..