Vijaykumar Dudhale
भाजपकडून लोकसभेच्या 2024 च्या चालू निवडणुकीत तब्बल 116 आयारामांना उमेदवारी देण्यात आलेली आहे.
देशभरात अस्तित्व असलेल्या काँग्रेसमधून सर्वाधिक नेते भाजपमध्ये गेले आहेत, त्यातील 37 नेत्यांना भाजपने लोकसभेची उमेदवारी दिली आहे.
काँग्रेसनंतर बीआरएस अर्थात भारत राष्ट्र समितीचे नेते भाजपच्या गळाला लागले आहेत. बीआरएसमधून आलेल्या 9 जणांना भाजपने लोकसभेच्या आखाड्यात उतरविले आहे.
गेली काही वर्षे सक्रिय राजकारणापासून अलिप्तवादी धोरण स्वीकारणाऱ्या मायावती यांच्या पक्षातून आलेल्या आठ नेत्यांच्या गळ्यात भाजपने लोकसभेच्या उमेदवाराची माळ घातली आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षातून आलेल्या सात नेत्यांना भाजपने खासदारकीचे तिकीट दिले आहे.
संसदेत कायम मदतीला येणाऱ्या बिजू जनता दलाच्याही सहा नेत्यांना कमळाच्या चिन्हावर भाजपने लोकसभेसाठी निवडणुकीत उतरवले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडलेल्या सहा आयारामांना भाजपने उमेदवारी दिली आहे.
समाजवादी पार्टीतून आलेल्या सहा, आम आदमी पार्टीच्या दोघांना, तर इतर पक्षांतून आलेल्या 31 नेत्यांनाही भाजपकडून लोकसभेचे तिकीट देण्यात आलेले आहे.
R