भाजप नेत्याचा आक्षेप अन् दिया मिर्झाचा 'व्हिडीओ' बीएमसीनं केला डिलिट; काय आहे प्रकरण..?

Deepak Kulkarni

दिया मिर्झा

दिया मिर्झा ही एक प्रसिद्ध भारतीय मॉडेल, अभिनेत्री आणि निर्माती आहे.

Diya Mirza BMC Controversy | Sarkarnama

'फेमिना मिस इंडिया'

दियानं ग्लॅमरच्या दुनियेत पाऊल टाकतानाच मॉडेलिंगपासून सुरुवात करून 2000 मध्ये 'फेमिना मिस इंडिया' स्पर्धेत तिसरं स्थान पटकावलं. विशेष म्हणजे त्याच वर्षी तिनं 'मिस आशिया पॅसिफिक' हा किताब जिंकला होता.

Diya Mirza BMC Controversy | Sarkarnama

RHTDM नं लोकप्रियता...

2001 मध्ये आलेल्या 'रहना है तेरे दिल में' (RHTDM) या चित्रपटाद्वारे दियानं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटानं तिला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. अनेक चित्रपटांत काम केलं आहे.

Diya Mirza BMC Controversy | Sarkarnama

दिया पुन्हा चर्चेत

अभिनेत्री दिया मिर्झा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. बीएमसीच्या दिवाळी जनजागृती मोहिमेसंदर्भातला एक व्हिडीओ तिनं केला होता.

Diya Mirza BMC Controversy | Sarkarnama

दियाच्या व्हिडिओवर आक्षेप

भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी दिया मिर्झाच्या व्हिडिओवर तीव्र आक्षेप घेतला. त्यांनी "दिवाळी कशी साजरी करावी याचे धडे आम्हाला दिया मिर्झाकडून घेण्याची गरज नाही. आमच्या परंपरा आणि संस्कृती आमच्यात खोलवर रुजलेल्या असल्याचं म्हटलं आहे.

Diya Mirza BMC Controversy | Sarkarnama

व्हिडिओ हटवला

अमित साटम यांच्या आक्षेपानंतर बीएमसींनं दियाचा व्हिडिओ आपल्या अधिकृत सोशल मीडिया पेजेसवरून हटवला आहे. मुंबईतील फटाक्यांमुळे होणारे ध्वनी व वायू प्रदूषण रोखण्यासाठी बीएमसीने एक विशेष मोहीम सुरू केली आहे.

Diya Mirza BMC Controversy | Sarkarnama

स्वतःची वेगळी ओळख..

मात्र, दियानं अभिनेत्री म्हणून कारकीर्द घडवतानाच तिनं निर्माती, लेखिका आणि सामाजिक कार्यकर्ती म्हणूनही स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. 

Diya Mirza BMC Controversy | Sarkarnama

दोन लग्नं...

दियाचं पहिलं लग्न हे 2014 मध्ये बिझनेस पार्टनर साहिल संघासोबत झालं होतं. परंतु 2019 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. यानंतर तिनं फेब्रुवारी 2021 मध्ये उद्योगपती वैभव रेखींशी दुसरं लग्न केलं, त्यांना एक मुलगा आहे.

Diya Mirza BMC Controversy | Sarkarnama

NEXT: भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर नेत्यांना नेमका काय फायदा होतो? निवडणुकीपासून सत्तेपर्यंतचं गणित

BJP-Party-Joining-Benefits-1.jpg | Sarkarnama
येथे क्लिक करा...