Kapil Mishra : कायदा मंत्र्यावरच चालणार आता केस, काय आहे प्रकरण आणि कोण आहेत भाजप मंत्री कपिल मिश्रा?

Aslam Shanedivan

दिल्लीत दंगल

2020 साली ईशान्य दिल्लीत दंगल उसळळी होती. ज्यात 53 लोक मारले गेले होते. तर 700 हून अधिक लोक जखमी झाले होते.

Delhi riots 2020 | Sarkarnama

मोहम्मद इलियास

याप्रकरणी यमुना विहारमधील रहिवासी मोहम्मद इलियास यांनी न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली होती

Delhi riots 2020 | Sarkarnama

कपिल मिश्रा

दिल्ली दंगलींप्रकरणी दिल्लीचे कायदा आणि न्यायमंत्री कपिल मिश्रा यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश राऊस अव्हेन्यू न्यायालयाने दिले आहेत.

Kapil Mishra | Sarkarnama

पाच घटनांचा उल्लेख

इलियास यांनी कपिल मिश्रासह सहा जणांविरुद्ध एफआयआर दाखल करताना, पाच घटनांचा उल्लेख केला होता.

Kapil Mishra | Sarkarnama

आरोप काय आहे?

तक्रारीनुसार, 23 फेब्रुवारी 2020 रोजी कपिल मिश्रा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कराडमपुरी येथे रस्ता अडवला आणि मुस्लिम आणि दलितांच्या गाड्या फोडल्या.

Kapil Mishra | Sarkarnama

नागरिकत्व सुधारणा कायदा

तसेच नागरिकत्व सुधारणा कायद्याविरुद्ध निदर्शने करणाऱ्या आंदोलकांना धमकी देण्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

Kapil Mishra | Sarkarnama

रेखा गुप्ता

काहीच महिन्यांच्याआधी दिल्लीत सत्तापालट झाली असून भाजप सत्तेत आली आहे. तर रेखा गुप्ता दिल्लीच्या मुख्यमंत्री झाल्या आहेत. तर कपिल मिश्रा यांच्यांकडे कायदा आणि न्यायसह 5 खाती देण्यात आली आहेत.

Kapil Mishra | Sarkarnama

E Bike Taxi ने फिरा बिनधास्त! काय आहेत नियम? महिला सुरक्षेचं काय? सगळ्या प्रश्नांची उत्तर

आणखी पाहा