Aslam Shanedivan
आज दसरा विजयादशमीचा मुहूर्त असून दरवर्षीप्रमाणे यंदाही दसऱ्याच्या निमित्ताने महाराष्ट्रात पाच मेळावे होणार आहेत.
यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा, उद्धव ठाकरे गटाचा, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा, मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील आणि पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा सुद्धा आहे.
याचवेळी राज्यभर राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचा दसरा मेळावाही होत आहे. अशाच एका मेळाव्यात पहिल्यांदाच मंत्री नितेश राणे दिसले.
यामुळे आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाल्या असून मंत्री आणि भाजपचे नेते नितेश राणे प्रथमच राष्ट्रीय स्वयंसेवक संघांच्या गणवेषात दिसल्याचे बोलले जात आहे
नितेश राणेंनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेला शस्त्र पुजनाच्या निमित्ताने भेट दिली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील मिठबाव येथे संघ स्वयंसेवकांसोबत विजयादशमीचा उत्सव नितेश राणे यांनी साजरा केला.
नितेश राणे स्वयंसेवकांसोबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संचलनातही सहभागी झाले.
नितेश राणेंनी यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अनुशासन, राष्ट्रभक्ती आणि सेवाभाव या मूल्यांचा गौरव करत संघाचे शताब्दी वर्ष हे केवळ उत्सव नसून भविष्यातील भारताचा अढळ निर्धार असल्याचे म्हटले आहे.