सरकारनामा ब्यूरो
तमिळनाडूतील भाजपचे सर्वात आक्रमक नेते म्हणून ओळखले जाणारे के. अण्णामलाई सध्या चर्चेचा विषय बनले आहेत.
तमिळनाडूचे ते भाजप पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असून याच राज्यात त्यांनी मागील लोकसभा व विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र, पक्षाला अपेक्षित यश मिळाले नाही.
पुन्हा एकदा विधानसभेच्या निवडणुकासाठी राजकीय नेत्यांमध्ये हालचाली वाढल्याचे चित्र दिसत आहे.
असं म्हटलं जात आहे की, के अण्णामलाई यांच्या भाजपाकडून प्रदेशाध्यक्षपद सोडण्यास सांगितले जाऊ शकते.
अण्णाद्रमुकच्या नेत्यांनी नुकतीच केंद्रीय गृहमंत्री अंमित शाह यांची दिल्लीत भेट घेतली आहे, मात्र अण्णाद्रमुक आणि अण्णामलाई यांचा छत्तीसचा आकडा आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याने दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र येणार का? आणि आले तर, यामध्ये अण्णामलाई अडथळा ठरू शकतील, असं म्हटलं जात आहे.
अण्णामलाई हे भाजपमधील आक्रमक युवा नेतृत्व म्हणून ओळखले जातात. या पक्षाला राज्यात ओळख निर्माण करून देण्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे. मात्र, भाजपाला अपेक्षित यश मिळालेले नाही.त्यामुळे अण्णामलाई यांना पदावरून हटवले जाणार की, नाही हे पाहणे आवश्यक असेल.