Pradeep Pendhare
मुंबईत महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यासह महायुतीच्या नेत्यांची उपस्थित होती.
बाॅलिवूडमधील अभिनेता-अभिनेत्री, खेळाडू, उद्योगपती देखील शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते.
शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह प्रमुख विरोधकांना शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण होते.
2019 मध्ये शिवसेना-भाजप युती तुटली, त्यानंतर उद्धव ठाकरे अन् देवेंद्र फडणवीस एकदा विधानभवनात आमने-सामने आले होते.
देवेंद्र फडणवीस यांनी 2024 मध्ये पु्न्हा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याने ते लास्ट टाईम 'मातोश्री'वर गेले होते, याची चर्चा रंगली आहे.
2014-19 पर्यंत शिवसेना-भाजप युती असताना, देवेंद्र फडणवीस 17 जुलै 2016 मध्ये अचानक 'मातोश्री'वर दाखल होत उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती.
2014-19 सत्तेत असताना शिवसेना-भाजप युतीला मुख्यमंत्री पदावरून युतीला तडे गेले अन् 2019 च्या विधानसभा निवडणुकीत युती तुटली.
शिवसेना फुटीनंतर, 2024च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असताना 5 आॅगस्टला उद्धव ठाकरेंना 'मातोश्री'वर भेटल्याचा वंचितचा दावा.
शिवसेना खासदार संजय राऊत 25 जुलैला मध्यरात्री 2 वाजता दिल्लीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना त्यांच्या निवासस्थानी भेटले होते, असाही 'वंचित'चा दावा आहे.